भाग १ चित्राचा अपघात. सकाळचे ११ वाजले असतील. शरद च्या ऑफिस मध्ये कामाला सुरवात होऊन आता फूल swing मध्ये चालू होतं. शरद परचेस ऑफिसर होता आणि रोजच्या रिपोर्टिंगची सकाळच्या मीटिंगची तयारी सुरू होती. अशातच त्याचा मोबाइल वाजला. सकाळच्या घाईच्या वेळेला कोण फोन करतय म्हणून कापाळाला आठ्या घालत फोन उचलला. फोन वर “ चित्रा ” अस लिहून आलं होतं. आत्ता हिला काय झालं सकाळी सकाळी? बायको नावाच्या प्राण्यांचं काही खरं नाही. अस पुटपुटतच फोन उचलला. “काय ग? मी जाम बिझी आहे. काय आहे ते पटकन सांग. पाल्हाळ लावू नकोस.” – शरद. “साहेब मी पोलिस कॉनस्टेबल शीतोळे बोलतोय. या बाईंना अपघात