६ आज देशाची परिस्थिती पाहता जाणवते की देशात बहिर्गत स्वातंत्र्य आहे. अंतर्गत स्वातंत्र्य नाही. आता सहज लोकांना प्रश्न पडू शकतो. बहिर्गत व अंतर्गत स्वातंत्र्य आहे? म्हणजे काय? तर त्याचं उत्तरच भारतीय स्वातंत्र्यात दडलेलं आहे. भारत दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करतो. त्यासाठी घराघरात तिरंगा लावतो. शाळेशाळेतील प्रभातफेऱ्या काढतो. कशासाठी? तर भारतीय लोकांना स्वातंत्र्याचा विसर पडू नये. त्यांनाही लक्षात राहावं, भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं ते. त्यांनाही आठवण असावी, भारतीय स्वातंत्र्यासाठी जीव गमावलेल्या लोकांची. बिचाऱ्यांना आवड नव्हती की आपण देशासाठी मरणागती जावं. देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी आपण इंग्रजांशी भांडावं. ज्याचा इंग्रजांना राग येवून त्यांनी आपल्याला फाशी द्यावी. परंतु ती फाशी