शेवटची सांज - 3

  • 561
  • 204

३          दिवसामागून दिवस जात होते. तसतसा रामदासही मोठा होत होता. त्याचं शिक्षण जोरात सुरु होतं व आता त्याला शाळा आवडायला लागली होती.         शाळेत मुलं होती. आजुबाजूच्या गावच्याही लोकांनी शिक्षणाची गरज पाहून आपली मुलं शाळेत टाकली होती. तिही मुलं रामदाससारखीच शाळेत शिकत होती. ज्या शाळेत भुमीगत असलेला व्यक्ती शिकवीत होता.          तो भुमीगत व्यक्ती. तो केवळ मुलांना शिकवीतच नव्हता तर एक प्रकारची प्रेरणाही देत होता. त्याचेकडे पाहून व त्याचं ऐकून शिकावसंच वाटत होतं. अशातच रामदास शिकला व तो चौथी पास झाला.          रामदासचं शिक्षण चौथीपर्यंत झालं. त्यानंतर त्याला