शेवटची सांज - 2

  • 186
  • 63

२         रामदास लहान होता. तेव्हा गावात पहिली शाळा निघाली. ती शाळा काढण्यामागे उद्देश होता समाज सुधारणा करणं. तसं पाहिल्यास त्या शाळेत शिकवायला एक शिक्षक होता. तो गावातच राहायला आला होता. तो शाळेत आपल्या मुलांना टाका असं नेहमी म्हणत असे. परंतु शाळेत शिकायला कोणी येत नव्हतं. ना कोणी शाळेत मुलं टाकायला तयार होतं. सगळ्यांची मुलं आपल्या आपल्या खेळण्यात गुंग असायची. तसा तो व्यक्ती त्या गावात व आजुबाजूच्या गावातही शिक्षणाबद्दलची जाहिरात करायचा. परंतु तरीही शाळेत नाव टाकायला कोणीच नव्हतं. कदाचीत तो शिक्षक म्हणजे इंग्रजांनी नियुक्त केलेला एक भारतीय व्यक्ती होता           तो चलेजावचा उठाव. त्या उठावात