शेवटची सांज' या पुस्तकाविषयी 'आयुष्यातील शेवटची सांज' ही माझी एकशे दहावी पुस्तक असून एक्यांशीवी कादंबरी आहे. मी आयुष्यातील सांज ही पुस्तक लिहिण्यामागे प्रेरणा माझे मित्र सुनील वाडेचीच आहे. असं म्हणायला काहीही हरकत नाही. सुनील वाडे नावाच्या माझ्या मित्रानं बरेचसे असे शिर्षक सुचवले की त्या शिर्षकाअंतर्गत शिर्षकावरुन मी बऱ्याच पुस्तका लिहू शकलो. विशेष सांगायचं म्हणजे ही पुस्तक लिहिण्यापुर्वी मी वृद्धाश्रम नावाची पुस्तक लिहिली. ज्यात मला त्या कादंबरीतील शिर्षकावरुन संभ्रम होता. त्यावेळेस केवळ शिर्षक समर्पकता जोपासण्यासाठी माझे मित्र सुनील वाडेला फोन केला. त्यांना कथानक सांगीतलं व विचारलं की त्यांनी संदर्भीय कथानकावर आधारीत मला शिर्षक सुचवावं. तेव्हा त्यांनी आयुष्यातील शेवटची