फजिती एक्सप्रेस - भाग 8

  • 798
  • 252

कथा क्र.०३: दोन मित्रांची धमालशेंदूरवाडी हे गाव तसं खूपच शांत, साधं आणि सर्वसामान्य गाव. इथले लोक आपापल्या कामात गुंतलेले, गावात काही फार घडतही नसे. पण गावात दोन मात्र असे जीव होते, ज्यांनी ही शांतता गढूळ करायची शपथ घेतली होती. त्यांची नावं होती – गप्या आणि बंड्या.गप्या म्हणजे एकदम लटपटीया. अंगाने बारीक, पण डोकं मात्र भन्नाट चालायचं. गावातल्या कुठल्याही माणसाचा आवाज, चलनवलन तो हुबेहूब नक्कल करून दाखवायचा. तर बंड्या होता थोडा धीट, थोडा गबाळा, आणि कायम ‘काय वेगळं करता येईल’ या विचारात गुरफटलेला.या दोघांची मैत्री म्हणजे गावातल्या बाकीच्यांसाठी एक प्रकारचा धसका होता. एकत्र आले की त्यांचं डोकं फारच भन्नाट योजनेत घुसायचं,