कथा क्र.०१:"भुतांच्या reels आणि नंदूच्या deals"अंतिम भाग ५: नथुचा शोध... काल रात्री नथू हवस राक्षसाच्या हाती लागला आणि माझं डोकंच फिरलं.रात्रीपासून मेंदू असा सुतकाच्या मिरवणुकीतल्या ढोलासारखा वाजत होता. झोप लागत नव्हती. डोळे मिटले की नथू धुक्यात ओढला जाताना दिसायचा आणि हवस राक्षस मागून हसत “आमचं पॅकेज फॅमिली फ्रेंडली नाही” म्हणायचा.पहाटे कोंबड्यानं आरवलं, आणि मी उठलो तो काय… गोधडी फेकून अंगावरचं अंगरखं अर्धवट लटकलेलं, डोक्यावर केस झुपकेदार, जणू गावच्या बायकांच्या