* संत रोहिदासांची परीक्षा * हिंदूंची पवित्र तीर्थक्षेत्रे संपूर्ण भारतभर प्रस्थापित असून अस्तित्वात आहेत. उत्तर प्रदेशातील काशी, (वाराणसी, बनारस) हे भारतातील एक सर्वोच्च धार्मिक तीर्थस्थान आहे. याच काशी क्षेत्राच्या जवळ सिरगोवर्धनपुर नावाचे गाव आहे. या गावात चर्मकार समाजाचे मोठी वस्ती होती. याच वस्तीत श्री संतोखदास व कलसा देवी नावाचे जोडपे राहत होते. त्यांना अपत्य नव्हते. एका महात्म्याने त्यांना आशीर्वाद दिला तुझ्या घरी असा पुत्र जन्म घेईन कीं ज्याच्यामुळे तुमच्या कुळाचे नाव होईल. संतोखदासला आनंद झाला. ते लगबगीने घरी आले व त्यांनी