अनपेक्षित - भाग 2

  • 174
  • 81

सुदीपने पुढे होऊन निधीशी हस्तांदोलन केले ..निधीकडे पाहत हसून तो म्हणाला “ओहो ..आपण का त्या ?खुप ऐकलेय रिया आणि प्रिया कडून तुमच्याबद्दल ..“शी जीजू अहो जाहो काय ?फक्त निधी म्हणा न मला ..बर बुवा ..असे म्हणत सुदीपने आपल्या जवळच्या एका तरुणाला हात धरून पुढे ओढले आणि म्हणाला ..“समित ये ना पुढे तुझी पण ओळख करून घे आमच्या “साली”बाई आणि त्यांच्या मैत्रिणीशी ..क्रीम रंगाचा झब्बा आणि सलवार घातलेला समित खूपच उमदा तरुण होता .“प्रिया तुझी जशी ही खास मैत्रीण आहे तसाच हा माझा जवळचा मित्र बर का ..हा पण सी ए आहे आम्ही एकत्रच शिकलोय .नागपूरला स्वतःचे ऑफिस आहे त्याचे ..आणि समित