Chapter 3 - काळ्या लाटाच गुढदरबार अजूनही रक्ताच्या वासाने भरलेला होता. सैनिकाचे निर्जीव शरीर थंडगार जमिनीवर पडलेले, त्याच्या भोवती काळसर खारट पाणी सांडलेलं. कोणीही जवळ जाण्याची हिंमत करत नव्हतं.राजा वीरधवल आपल्या सिंहासनावर उभा राहिला. त्याचे हात थरथरत होते, पण आवाज अजूनही दणदणीत.“हे मानवी नाही. समुद्रातून काहीतरी आपल्यामध्ये आलंय. जर आपण आत्ताच थांबलो नाही… उद्या आपलं राज्यच उरणार नाही.”रणभीम अजूनही तलवार घट्ट पकडून होता. त्याचे डोळे रक्तवर्णी झालेले, पण भीतीपेक्षा रागाने तेजाळलेले.“महाराज, याचं मूळ समुद्रात आहे. किनाऱ्यावर मी जे पाहिलं… ते अजून आपल्याला गाठायला येणार आहे.”संपूर्ण दरबारात कुजबुज सुरु झाली. काही सरदार थरथरत होते—“आपण किल्ल्याचे दरवाजे बंद करूया.”“नाही,