रेशमी नाते : His Arranged Bride - 1

भाग १( Blue Diamond Resort )आज BLUE DIAMOND RESORT खूप सुंदर सजावण्यात आला होता. आज सकाळपासून तिथे तयारी सुरु होती. सगळीकडे खूप सुंदर असं DECORATION करण्यात आलं होतं. सगळीकडे फुलांच्या माळा आणि फुलांच्या पाकळ्यांनी सुंदर अशी सजावट केली होती. खूप सुंदर असं LIGHTING करण्यात आलं होतं. समोर LAWN च्या मधोमध सुंदर असा लग्नाचा मंडप सजावण्यात आला होता आणि समोर GUESTS ला बसण्यासाठी काउच ARRANGE करण्यात आले होते. सगळं काही एकदम परफेक्ट होतं. आणि असणारच. शेवटी देशमुख फॅमिलीचा EVENT होता हा. सगळं काही अगदी ELEGANT आणि PERFECT असणारच. मुहूर्ताची वेळ जवळ येऊ लागली तसं हळू हळू सगळे GUESTS तिथे जमा