समर्थ आणि भुते - भाग 9

  • 81

कालघाटी  : येहूधीज तलघर .. चारही दिशेना कालोखी अंधकार पसरला होता .. - मध्येच आकाशात चंदेरी रंगाची बिन आवाजाची   विज कडकडायची ,  तसा काळोख भेसूरपणे ऊजळून निघत होता - आणि अंधारात लपलेल आजुबाजुच दृष्य नजरेस पडत होत -       तीस - चाळीस फुट उंचीच्या काळ्याशार पाषाणी टेकड्या ,  खालची काळ्या वाळूची जमिन -          खाली जमिनीवर पसरलेल्या   काळ्या वाळूवरुन  तो काळ्या रंगाचा फेंगड्या , वाकलेल्या टोकदार विषारी डंखाचा विंचू  हळकेच पुढे पुढे चालत जात होता-           अचानक त्या विंचूच्या अवतीभवतीची जमिन भुकंप आल्यासारख कंपन पावू लागली, आजूबाजूचे दगड गोटे थरथर करत थर थरु लागले ,