Chapter 8 : विधीची रात गावात सायंकाळ होत होती , पण आभाळात सूर्यास्ताची नाही , तर सावल्यांची चाहूल होती. प्रत्येक घरात दरवाजे बंद , खिडक्या हलत्या , आणि एक अनामिक अस्वस्थता पसरलेली . शंकरनाथ , प्रियंका , दीपक आणि चेतन – हे चौघं आता झाडाजवळ जमले होते. चेतन अजूनही थकलेला, शांत, आणि थोडासा अनोळखी वाटत होता. त्याच्या डोळ्यांखाली काळे वर्तुळे होती , आणि त्याच्या छातीत तेच लॉकेट अजूनही अडकलेलं होतं . " तयार आहात का सगळे ? " शंकरनाथने विचारलं . " हो ," प्रियंका धीटपणे म्हणाली . तिच्या हातात एका नवजात बाळाचं वस्त्र आणि एक छोटासा मृत्तिका-गर्भ होता