तुम्हाला प्रेम कळत का?

  • 273
  • 72

कस काय मंडळी.. मजेत ना.. गृहीत धरतो कि आपण सुखरूप असाल. चला सुरु करूया आपला आजचा प्रश्न तुम्हाला प्रेम कळत का?या प्रश्नाचा उलगळा करत जाऊया. प्रेम हा दोन अक्षराचा शब्द स्वतामध्ये किती तरी भावना आणि कथा सामावून घेतो ना. प्रेम म्हटल्यावर तुम्हाला तुमची प्रियसी, प्रेमिका यांची कदाचित आठवण आली असेल. सध्याची परिस्थिती पाहता हे साहजिकच आहे.आपण सुरुवात करूया प्रेमाच्या उगमापासून....आठवतय का? लहानपणी जेव्हा आपण खोडकर कृत्ये करायचो, तेव्हा कळत न कळत छोटी-मोठी दुखापत करून घ्यायचो.                       त्या दुखापतीवर अगदी प्रेमाने उपचार करणारी, मायेने आपली समजूत काढणारी आपली "आई".