️ First Ride ️मीरा अमर आणि अनुरागला बाय करते आणि गाडीत बसून ती घरी जायला निघते.. गाडी तिथून थोड्या अंतरावर गेली असेल तोच अचानक तिची गाडी पंक्चर होते... ड्रायव्हर गाडी रस्त्याच्या बाजूला घेतो...मीरा : काय झालं ड्रायव्हर काका ???ड्रायव्हर: गाडी बंद झाली का झाल कळेना ....मीरा : आता काय करायचं???ड्रायव्हर : इथे कुठे जवळ गॅरेज आहे का ते पाहतो ...तुम्ही इथेच थांबा... त्यांनी गाडी बघितली पण त्यांना काही समजले नाही...मीरा गाडीपाशी उभी राहते.... त्यावेळी अमर आणि अनुराग सुद्धा गाडीवरून जात असतात ....त्यांना मीरा रस्त्याकडेला गाडी जवळ उभी असलेली दिसते ....अमर : काय झाल मीरा ??? मीरा : माझी कार अचानक बंद पडली