वायंगीभूत - भाग 6

        दोन तीन वेळा हाका मारल्यावर राखण्यानी  बाबुचे शब्द ऐकले. उंच डेळक्यात बसलेल्या शरपंजरी बाबुला त्यातल्या एकाने ओळखले. "अरे ह्यो दणदणो म्हाजन....... धा पंदरा रोजामागे खंय नायसो झालो म्हणाहुते ल्वॉक....." दोन रुखाडी पोर वर चढले नी त्यानी थावरीत थावरीत बाबुला खाली उतरला. त्याला तहान लागलेली होती . पोरानी त्याला पाणी पाजल्यावर बाबूला जरा हुषारी वाटली. पोरानी भाकरी खावून झाल्यावर त्याला बकोट धरून हळू हळू चालवीत मोंडे वाडीत नेवून सोडला. तिथे भगत मोंड्याच्या  ओसरीवर तो टेकला. पाणी पिवून सावध झाल्यावरतो म्हणला, “ दोन देवस झाले...पोटात अन्नचो कण गेलेलो नाय...... माका गोळोभर भात वाडा.” मग घरणीने त्याला पत्रावळीवर बचकाभर