मध्यान् रात्री जोरात लघवीला लागली नी बाबुला जाग आली. उठून बसत त्याने अंदाज घेतला. अंधारात चेड्याची धूसर आकृती पोवळीबाहेर बसलेली दिसत होती. तो उठून आत गेला. गर्भागृहाच्या डाव्या उजव्या अंगानी बाहेर पोवळीत जायला दरवाजे होते. चेड्याला पत्ता लागू न देता एका दाराने बाहेर पडून मागिल बाजूच्या प्रवेश द्वाराबाहेर जावून पट्कन लघवी करून यायचा त्याचा बेत होता. चेडा त्याच्या जागेवरून चाळवलेला नव्हता. बाबु खाली बसून एका बाजूच्या दारातून बाहेर पडला. पोवळीच्या भिंतीचा आडोसा असल्याने चेड्याला त्याचा पत्ता लागणेच शक्य नव्हते. बसून पुढे सरकत सरकत तो मागच्या प्रवेश द्वारा बाहेर पडला नी चार पावले बाजुला