गावातल्या कडेला असलेलं ते घर फार जुने होते.दगडी भिंतींवर शेवाळ चढलेलं, खिडक्या तुटलेल्या आणि दरवाजे अर्धवट लोंबकळत. पावसाळ्यात त्या घरातून रात्री विचित्र आवाज ऐकू यायचे जणू कोणी आत बंदिस्त होऊन बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे.लोक म्हणायचे, त्या घरात पूर्वी एक कुटुंब राहत होतं. घराचा मालक बांधकामात काम करायचा, पण एकदा भिंत बांधताना तो जिवंतपणी भिंतीत गाडला गेला. कुणाला नीट माहीत नव्हतं अपघात झाला की जाणीवपूर्वक कोणीतरी केलं. पण त्यानंतर ते घर ओसाड झालं.एकदा गावात सचिन नावाचा मुलगा पैज लावून म्हणाला –“