बोलका वृद्धाश्रम - 10

**********************                        १०                           स्वानंदला वाटत होतं की ती स्नेहल, ज्या स्नेहलनं फार दुःख भोगलं. तिला जीवनभर सुखच मिळालं नाही. विवाहापुर्वी आणि विवाहानंतरही. तिचा पहिला विवाह फसला होता. ज्यातून तिच्या पतीनं तिला घरातून हाकलून लावलं होतं आणि जेव्हा तिनं स्वानंदसोबत विवाह केला होता. तेव्हाही तिनं यातनाच भोगल्या होत्या. आठवत होता तोही एक प्रसंग. ज्यावेळेस स्नेहल गरोदर होती. तेव्हा तिला गर्भातच समस्या आल्या होत्या. डॉक्टरांनी सांगीतलं होतं की आपण एक बाळ वाचवू शकतो नाहीतर आई. तसं स्वानंदचं तिच्यावर प्रेम असल्यानं