******************** ९ उन्हाळ्याचे दिवस होते. स्वानंदच्या शाळेला उन्हाळी सुट्ट्या होत्या. तशा स्नेहललाही सुट्ट्याच होत्या उन्हाळी. उन्हाळभर स्वानंद शेती विकत घेण्यासाठी वणवण फिरला. ज्यात त्याची भेट स्नेहलशी झाली नाही. फोन नसल्यानं फोनद्वारेही तिच्याशी संपर्क करता आला नाही. हाच अवकाश मिळाला स्नेहलला. अन् याच दरम्यान तिला एक व्यक्ती पाहायला आला. मुलगा देखणा होता व इंजीनियर असल्यानं तो तिला पसंत पडला. तिनं आपल्या वडिलांच्या इच्छेखातर आपला विवाह साजरा केला व ती सासरी गेली होती. ज्यातून ती स्वानंदनं तिला केलेली मदतही विसरुन गेली होती. हे तिनं तिच्या वडिलांच्या हार्ट