************************************ ८ ते दोन वर्ष स्वानंदचे बरेच वियोगात गेले होते. स्नेहल स्वानंदची पत्नी बनली असली तरी ती त्याच्या घरी नव्हती. तिला त्याचे घरात राहताच येत नव्हते. शिवाय त्यांना आपला विवाहही जगजाहिर करता येत नव्हता. विवाह झाला असला तरी ते एकमेकांना आलिंगन देवू शकत नव्हते. स्वानंदनं स्नेहलशी विवाह केला असला तरी त्यात त्याला काही प्रश्न पडले होते. पहिला प्रश्न पडला होता, तिच्यासोबत न राहण्याचा. ज्याय कधीकधी आठवडाभर त्यांची मुलाखत व्हायची नाही. कधीकधी महिनाही निघून जायचा. उन्हाळ्यात तर तो दोन दोन महिने तिला भेटू शकत नव्हता. कारण शाळेला