७ आज रविवार होता. आज रविवारचा दिवस उजळला. ज्या दिवसाची त्याला प्रतिक्षा होती. त्यातच तो त्या दिवसाची तासागणिक वाट पाहात होता. एक एक मिनीट त्याला कठीण जात होता. दुपारी त्याला झोपही येत नव्हती. आज तसं त्याला तिच्यासोबत फिरायलाही जायचं नव्हतं. जसा तो दर रविवारी तिच्यासोबत फिरायला जायचा. ज्यात त्याला मजा यायची. तो वाट पाहात होता तीन वाजायची. तसं तिनं त्याला चार वाजता घरी बोलावलं होतं. अशातच तीन वाजले व तो उठला. त्यानं हातपाय धुतले. त्यानंतर त्यानं चेहर्यावर थोडासा पावडर चोपडला. कपडे घातले व लवकरच तो घरातून बाहेर