बोलका वृद्धाश्रम - 6

६                             दिवसामागून दिवस जात होते. नुकताच पावसाळा लागला होता. हा उन्हाळाही तसाच कोरडा गेला होता. स्नेहलला याही वर्षी कोणीच पाहायला आलं नाही. त्यातच स्नेहल व स्वानंदचं वय वाढत चाललं होतं. ते एकमेकांना भेटतच राहिले. त्यातच एक दिवस तिनं विचारलं,         "स्वानंद, तू माझ्याशी लग्न करशील काय की हा तुझा टाईमपास आहे."           "आधी तू सांग."           "मला तर वाटतेय की तू माझ्याशी विवाह करावा. परंतु तुला काय वाटते?"          "मलाही अगदी तसंच वाटते."