५ स्नेहलचं घर जवळ आलं होतं. तसे रात्रीचे साडेनऊ वाजले होते. स्नेहलनं घराच्या अगदी जवळच गाडी थांबवायला लावली होती. त्यानंतर ती उतरली. तिनं त्याला बाय केलं. वाटत होतं की आज त्याच्यापासून विलगच होवू नये. परंतु विचार होता. विचार होता की आपल्या मायबापाला न विचारता कसं विलग व्हावं. म्हणूनच ती आपल्या घरी गेली होती. स्नेहल घरी गेली. तशी वेळ झालेली पाहात बऱ्याच वेळेपासून चिंतीत असलेली आई तिला विचारायला लागली. "बाळ, वेळ कसा झालाय एवढा?" "आई, मैत्रीणीच्या घरी कार्यक्रम होता. त्यात वेळ लागलाय. तसं मी