४ स्वानंद शहरात रुळावला होता. तो शहरातच चांगले वेतन कमवीत होता. त्याला आता काही कमी नव्हतं. परंतु तो सुखी नव्हता. कारण तो एकटाच घरात राहात होता व त्याला घरातच एकटे राहतांना वेगवेगळे विचार येत होते. स्वानंद आज तरुण झाला होता व त्याला विवाह करावा असं वाटत होतं. तसं पाहिल्यास जात, त्याही काळात चरणसीमेवर होती. तशीच जातीची मुलगी मिळणं त्याचेसाठी कठीण होतं. स्वानंदची नोकरी सरकारी झाली होती. परंतु त्याची नोकरी जरी सरकारी झाली असली तरी तो आजही फाटक्याच वस्रात वावरत होता. त्यानं गरिबी अनुभवली