३. ********************* त्याचा जन्म ग्रामीण भागातीलच. आज तो शहरात स्थावर झाला होता. तसा तो सुखी होता. कारण शहरात फार मोठं काम नव्हतं. ना काही समस्या होत्या. ना कोणतीच भीती होती. तरीही त्याचा जीव शहरातील गर्दीत घुसमटच होता. ती असह्य जीवघेणी गर्दी त्याला चांगली वाटत नव्हती. त्याचं नाव स्वानंद होतं. स्वानंदाला शहरातील वातावरण न आवडायचं कारण होतं, ते प्रदुषण. शहरात वेगवेगळ्या प्रकारचं प्रदुषण होतं. कधी कारखान्यातून धूर निघायचा तर कधी वाहनातून धूर निघायचा. कधी कारखान्यातून निघणारा भोंग्याचा आवाज त्याला त्रस्त करायचा तर कधी त्याला वाहनांचा येणारा कर्णकर्कश आवाजही त्याला त्रासच