बोलका वृद्धाश्रम - 2

  • 72

२                                आज काळ बदलला आहे व बदलत्या काळानुसार आपल्याला अमेरिका हा देश पहिल्या क्रमांकाचा वाटत आहे. तसं पाहिल्यास अमेरिकेचा जन्म मुळात अर्वाचीन काळातील. तेथील संस्कृतीही अर्वाचीन काळातील. त्यातच त्या देशाचा शोध मॅगेलॉन व कोलंबस यांनी लावला. तोही अलिकडील काळातच. तरीही आपण त्या देशाचा आदर्श घेतो. त्याची संस्कृती महान समजतो. त्यांच्या संस्कृतीनुसार वागतो. त्यातच आपले कपडे, आपलं रहनसहन बदलवीत असतो. हे जरी खरं असलं तरी आपली भारतीय संस्कृती ही काही कोणत्याही बाबतीत कमी नाही. ती इतर देशांपेक्षा महान आहे आणि बरंच काही आपल्याला शिकविणारीही आहे.