लोक नेहमी म्हणतात—“मुलगी स्वावलंबी झाली पाहिजे, आत्मनिर्भर झाली पाहिजे.”पण या वाक्याचं गांभीर्य कोण समजून घेतं?स्वावलंबन म्हणजे काय?लोक समजतात—नोकरी लागली, पगार आला, तर मुलगी स्वावलंबी झाली.नाही!नोकरी असलेला प्रत्येक पुरुष स्वतंत्र आहे का?नाही ना?तो बॉसच्या भीतीत जगतो, कर्जाच्या ओझ्यात जगतो, समाजाच्या दिखाव्याच्या नाटकात जगतो.म्हणजे केवळ पैसा कमावणं = स्वावलंबन नाही.स्वावलंबन म्हणजे— आतून मजबूत असणं. परिस्थितीशी न झुकणं. कुणाच्याही आधाराशिवाय जगण्याची तयारी असणं. स्वतःच्या निर्णयांना जबाबदार असणं.--- मुलगी जन्मली आणि बंधने सुरूएका मुलीचा जन्म झाला की घरात आनंद, पण सोबत भीती:“तिचं रक्षण कसं करायचं?”“लग्न कधी लावायचं?”“कुणाकडे जबाबदारी सोपवायची?”अगं, ही ‘जबाबदारी’ आहे की ‘मुलगी’?ज्या क्षणी आपण मुलीला ‘जबाबदारी’ म्हणतो, त्या क्षणी तिचं स्वातंत्र्य हिरावलं