अजिंक्यचे हे बोलणे ऐकून दीपक म्हणाला छे रे आज कुठले जमतय संध्याकाळी अंध शाळेच्या मुलांचा एक कार्यक्रम आहे त्याची व्यवस्था आहे माझ्याकडे ...असे कर तुच चल माझ्यासोबत कार्यक्रमाला” दीपक म्हणाला .“बरे राहु दे पुन्हा कधी तरी करू आपण प्लान ,पण मला नको बाबा त्या कार्यक्रमाचा आग्रह करू ..उगाचच बोअर होईन मी" अजिंक्य म्हणाला त्यावर दीपक म्हणाला ,”अरे येऊन तरी बघ खुप छान कार्यक्रम बसला आहे .कलाकार तर “एकसे एक” आहेत मजा येईल तुला ““खरे सांगु दीपक मला ती अंध मुले वगैरे पाहिली न अगदी कसेतरी होते .त्याचे ते खोबणीच्या आतले डोळे ,ती काठी हातात धरून जगायची धडपड ..नको वाटते रे तसे पाहायला ““वेडा आहेस