फजिती एक्सप्रेस - भाग 2

(15)
  • 582
  • 270

कथा क्र. १: "भुतांच्या reels आणि नंदूच्या deals"भाग २ : नथुचा भूतमय फॅन मिटपुण्यात परत आल्यावर सकाळची माझी दिनचर्या अगदी बदलून गेली होती. आधी मी डोळे उघडताच चहा किंवा कॉफीचा विचार करायचो, पण आता पहिलं काम म्हणजे फोन हाती घेऊन @Konkan_ghosts_with_jokes ची नोटिफिकेशन्स तपासणं. मोबाईल हातात घेताच टिंग-टिंग-टिंग! असा आवाज यायचा, आणि स्क्रीनवर एकाहून एक भन्नाट कमेंट्स चमकायला लागायच्या. कुणी लिहिलंय – “भाई, तुमच्या डोळ्यांचा स्पार्क इतका भयानक आहे की लाइट बिल वाचेल!”, तर दुसरा म्हणायचा – “भूत असूनही तुमचा sense of humour भन्नाट आहे! Alive असताना इतका कधी हसलो नव्हतो!” काही तर अगदी वेगळेच प्रश्न विचारायचे – “भाई, तुम्ही