सुनयना - भाग 2

  • 75

त्याच्याकडे अजिबात न बघता खाली बघत आईने दिलेल्या भाज्या तिने पिशवीत भरल्या आणि त्या दोघी पुढे निघाल्या .बाजारात तिचा एक हात कायम आईच्या हातात होता .तिची आई सोबत असताना असा पाठलाग करणे बरे नव्हते त्यामुळे तो त्यांच्या पासुन बर्याच अंतरावर राहुन त्यांना न्याहाळत राहिला .पुढे एक दोन ठिकाणी भाजी घेतल्यावर बाजाराच्या कोपर्यावर त्या फळाच्या दुकानात आल्या .तिथे मात्र ती काही फळे हातात घेऊन  आईला हे घे, ते घे असे सुचवत होती .फळांची खरेदी झाल्यावर ती आईला काहीतरी म्हणाली तसे तिच्या आईने दोन शहाळी विकत घेतली .तिच्या हातातली पिशवी खाली ठेवली आणि नारळ पाणी प्यायला तिच्या हातात दिले .ती खुप खुश दिसत