कृतांत - भाग 5

  • 270
  • 113

कृतांत ५  दुसर्या दिवशी भल्या पहाटे शर्मा,मौर्ये , गौरी व राज उत्खनन चालू असलेल्या ठिकाणी गेले. मुख्य राजवाड्याच्या जागेपासून सुमारे कोसभर अंतरावर मारुतीच देऊळ असलेली जागा होती.राज त्याच्या जवळच्या नकाशावरून मार्ग दाखवत होता.राजने मिळालेल्या माहितीनुसार एक नकाशा तयार केला होता.एका भल्यामोठ्या पिंपळाच्या झाडाखाली राज थांबला." या इथेच कदाचित ते मारूती मंदिर असावे.कारण तो मारुती अश्वस्थ मारुती असल्याचा उल्लेख त्या लेखनातं आहे. आपल्याला इथेच शोध घ्यावा लागेल."" नक्की ना?" गौरीने विचारले." हो शंका घेवू नका. आपल्या जवळ वेळ कमी आहे.काहितरी अघटीत घडणार असं मला वाटतंय."शर्मा व मौर्ये जागेच निरिक्षण करत होते. गौरीने तिथे आपली जमीनीखालील रचनेचा वेध घेणारी उपकरणे बसवली व