Chapter 7 : भिंतीवरची सावली " तिचा सूड अद्याप पूर्ण झालेला नाही ... पण आता आपण तिच्या कहाणीचा शेवट लिहायला सुरुवात केली आहे . " शंकरनाथच्या त्या वाक्यानंतर सर्व काही शांत झालं होतं ... पण ती शांतता काही काळापुरतीच होती . गावात दुसऱ्याच दिवशी सकाळी एक विचित्र घटना घडली . चौकातल्या जुन्या वाड्याच्या भिंतीवर कोळश्यासारख्या जळालेल्या खुणा दिसू लागल्या . त्या खुणा एकाच दिशेने जात होत्या — वाड्याच्या आतल्या खोलीकडे . आणि भिंतीवर एका कोपऱ्यात कुणीतरी बोटांनी कोरल्यासारखं लिहिलं होतं : " मी अजूनही शोधतेय ... बाळ कुठंय ? " गावकऱ्यांनी ही बाब लक्षात आणून दिली तेव्हा पंडित शंकरनाथ