पहाटे रोजच्याप्रमाणे जाग आल्यावर तो शिपणं करायला गेला. नेहेमी प्रमाणे ठराविक लाटा मारल्यावर आगरातल्या सहाही रांगा भरलेल्या असणार या अंदाजाने तो लाट थांबवून बघायला गेला. पण आज जेमेतेम पहिली सरी भरलेली होती. त्याच्या काळजात चर्रर्र झालं...... त्याच्या लक्षात आलं की आज कनवटीला तोडगा नव्हता त्यामुळे वांगीभुताचा चेडा मदतीला आलेला नाही. माडाच्या पातीत बांधलेला तावीज कायम जवळ ठेवायचा ही अट म्हंमदने बजावून बजावून सांगितलेली होती. पात सुकण्यापुर्वी पिशवी शोधून काढणे गरजेचे होते. अगर म्हंमदची भेट घेवून पिशवी हरवल्याची गोष्ट त्याला सांगून त्यावर काहीतरी तोडगा शोधायला हवा होता. उजाडण्याची वाट न बघता बाबु तडक मणच्याला म्हंमदची भेट घ्यायला निघाला. तो म्हंमदच्या घरी