वायंगीभूत - भाग 3

                           दणदणा  तोडगा घेवून आला नी दुसऱ्या दिवशी तो शिपणं करायला गेला. चाळीसेक लाटा मारल्यावर लाट थांबवून दुसऱ्या  ओळीत पाणी परतायला तो गेला नी बघतोतर  सगळ्या ओळीत पाणी तुडुंब भरलेलं होतं. आश्चर्याचा भर ओसरल्यावर त्याच्या लक्षात आलं की हा त्या वायंग्याच्या चेड्याचा प्रताप होता. बागेत फिरून  फिरून पडलेल्या सुपाऱ्या, नारळ पुंजावतानाही हाच चमत्कार व्हायचा. ओंजळ्भर सुपाऱ्या ठेवून बाबु पुन्हा  पडीच्या सुपाऱ्या  पुंजावून आणी पर्यंत  मूळ जागी चौपट नग वाढलेले असत. कणगीतून  भात उसपताना दोन चार मापटी उसपून पोत्यात ओती पर्यंत पोतं तोंडोतोंड भरत असे नी  कणगीतून उसपल्यावरही  कणगीतला