प्रस्तावना भोर झालेला असतो. चिखलदऱ्याच्या एका गजबजाटापासून दूर असलेल्या खेडेगावातलं घर. मातीच्या अंगणात ओलसर गारवा, आणि स्वयंपाकघरातून येणाऱ्या फोडणीच्या वासाने एक वेगळीच शांतता भंग पावते. नारायण देशमुख — वय वर्षं २६. चेहऱ्यावर जबाबदाऱ्या आणि डोक्यावर स्वप्नांचं सावट. नुकतीच एम.कॉमची परीक्षा पास केलीय. पण यशाची चव अद्याप ओठांवर नाही. घरी म्हातारे वडील, अंगावर पडलेली काळजी घेणारी आई, आणि लग्नासाठी वयात आलेली बहिण — सगळ्यांचं ओझं हसत हसत पेलणारा नारायण. आज त्याचा Buldhana ला मुलाखतीसाठी जाण्याचा दिवस. पण मन मात्र एकाच विचारात अडकलेलं — “हे घर सोडून जायचं म्हणजे खरंच पुढं जाणं आहे की मागे काहीतरी हरवणं?”