तो प्रियकर नव्हता,तो फौजी होता - 5

  • 327
  • 123

भाग ५: अंतिम संघर्षपौर्णिमेचा चंद्र आज वेगळाच भासवत होता… तो तुरुंगाच्या लाकडी खिडकीतून अलगद डोकावत होता. जणू अंधारावर मात करण्यासाठी स्वतःच्या सर्व तेजाने झगडत होता. त्या शितल प्रकाशात तुरुंगाच्या फटींतून एक अलौकिक शांतता झिरपत होती. झोपलेले कैदी खोल श्वासात हरवले होते, पण एका कोपऱ्यात – एक धग अजूनही जिवंत होती.राजवीर.तो एकटक चंद्राकडे पाहत होता. मानवी देहातले असंख्य भाव एकत्र लपवलेले त्याच्या डोळ्यांत झळकत होते. समोरच्या जमिनीवर त्याने स्वतःच्या हातानं नीट करून ठेवलेला एक छोटासा कागद होता… त्यावर काही अक्षरं टपकत होती. काळजीपूर्वक, सावधपणे. जणू प्रत्येक अक्षर त्याच्या हृदयातून ओघळत होतं.ते पत्र होतं.सरितासाठी नव्हतं.त्या अधुऱ्या प्रेमकथेवर तो आता पूर्णविराम देऊन पुढे