शाळा सुरु झाल्याची घंटा झाली आणि एक, एक करुन मुले वर्गात शिरू लागली गुरुजी वर्गाच्या दारात उभे राहून सर्वाना आत पाठवु लागले .श्रीपती आत शिरला तेव्हा सरांनी पाहिले की तो “अनवाणी” आला आहे .बाहेर अक्षरशःउन्हाळा “मी” म्हणत होता .अशा वेळेस बिनचपलाचे शाळेत येणे म्हणजे खरेच कठीण होते !! त्यात श्रीपतीच्या बाबाची झोपडी गावा बाहेर होती आणि रस्ता पण दगड धोंड्यांनी भरलेला .गुरुजींनी हटकलं श्रीपतीला, “अरे काय रे चप्पल कुठाय तुझे ?”“गुरुजी काल तुटले माझे चप्पल ..खुप जुने झाल्याने दुरुस्त पण होईना मग दिले टाकुन ““मग आता काय असा अनवाणीच येणार शाळेत ?”गुरुजींनी विचारले त्यावर काहीच उत्तर न देता श्रीपती बाकावर जाऊन बसला .श्रीपती