भाग ४ : रणसंग्रामाच्या उंबरठ्यावरतुरुंगाच्या भिंती आता पूर्वीसारख्या शांत नव्हत्या. अंधारातही जाणवणाऱ्या हलक्या हालचालींनी हवेत एक वेगळीच सळसळ निर्माण केली होती. जणू एखाद वादळ येण्याआधीचा क्षण.सगळं स्थिर, पण त्यामागे काहीतरी भयंकर घडणार याची चाहूल देणारं.राजवीर एका कोपऱ्यात उभा होता. डोळे मिटलेले, पण मनात प्रचंड हालचाल होती. त्याने पुन्हा एकदा मनातली योजना उलगडली, तपासली... आणि पक्की केली. वेळ खूप कमी होता.त्या देशद्रोह्यांनी, जे स्वतःला क्रांतीकारक म्हणवतात, देशावर हल्ला केला होता. त्याच्या सहकाऱ्यांना ठार मारलं, पर्यटकांना बंदी बनवलं... आणि देशाच्या सन्मानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला.पण आता वेळ होती उत्तर देण्याची. एकट्यानं नाही.पण त्या धूसर अंधारात ज्या डोळ्यांत अजूनही आशेचा झरा होता, जे