बेरी

"तुपाची बेरी आणि आठवणींची गोडी…"वाटीमध्ये साठवलेलं बालपणआठवणींसाठी वेळ लागत नाही, सुगंध पुरेसा असतो…आजही तुपाच्या डब्याजवळ गेलं, की नकळत नजर कढईकडे जाते… आणि मन मात्र उलट्या पावलांनी थेट लहानपणात पोहोचतं — तिथं, जिथं 'बेरी' नावाचं एक गोडसं स्वप्न तयार व्हायचं!आई रोज दूध घ्यायची — गवळ्याकडून. ते हि फारसं घट्ट नसायचं, पण रोज येणाऱ्या त्यात दुधात सुद्धा घरात साय जमा व्हायची. ती साय आई जमवून एका डब्यात भरवायची.साई लावणं हे तिचं एक मनोव्रतच होतं. रोजच्या दूधावरची साय – व्यवस्थित एका छोट्या डब्यात साठवलेली. ती साय जितकी खरं तर प्रेमाने लावलेली, तितकाच तिचा विरजणाचा सुगंधही खास असायचा! आठ-दहा दिवसात जरा चांगलीच साय तयार व्हायची