" आता तू आमका वळाकतस..... आमचा खानदानी घराणा. आमी गावचे मानकरी म्हाजन. दोनशे माड नी अडिजशे पोफ़ळ हा आमची. वीस खंडी खंडाचा भात येता...... दुपिकी मळो...... हाल्लीच शंभर कलमांची बाग उटवली. पण चार बाजून येवडा उत्पान असोन आज मितीक पन्नास रुपाये म्हणशा तर गाटीक नाय आमच्या. येरे दिवसा नी भर रे पोटा अशी कुडवाळ तऱ्हा ..... आमच्या काय उतवाक् धूर लागना नाय. लय थळा सोदून झाली. पण एकाचो म्हणशा तर गुन नाय......" आलेली किरकोळ गिऱ्हायकं मार्गी लागल्यावर जिक्रियाने बाबुला आत न्हेला. भिंतीवर हाजी मलंगाचा फोटो लावून त्यासमोर चटई टाकून डोक्याला गलप बांधून म्हमद पालथा पडला