भारती

“एकसाथ राष्ट्रगीत शुरू कर ...”या सरांच्या वाक्यासरशी भारती शाळेत शिरली .साडे दहा वाजायला फक्त दोन मिनिटे शिल्लक होती .चटकन जाऊन भारती मुलींच्या रांगेत उभी राहिली आणि तिने राष्ट्रगीतम्हणायला सुरवात केली .मनातून तीला अगदी हायसे ...वाटले शाळेत वेळेत पोचल्या बद्दल .शेजारी कमल तिची मैत्रीण उभी होती ..ती हसली आणि कुजबुजत म्हणाली “बर झाल आलीस लवकर नाहीतर आज पण बोलणी खाल्ली असतीस बाईंची “भारती ओशाळली ..हो ग ..अगदी धावत पळत आले बघ ..”अग पण तू वेळेत का निघत नाहीस घरातून ?“रोज काही तरी कारणाने उशीर करतेस ..एक तर इतक्या दुर रहातेस मग लवकर का नाहीस बाहेर पडत घरातून ?..कमल म्हणाली   काय सांगु  तुला आता