वाम्या एक जुने गोदाम बारमध्ये रूपांतरित करतो, जिथे त्याला एका अपूर्ण स्वप्नात अडकलेला आत्मा भेटतो.___________________________________आमचं गाव म्हणजे डोंगराच्या कुशीत विसावलेलं एक छोटंसं ठिकाण. एकमेव दगडांचा रस्ता, एक पान टपरी, आणि सकाळी ८ ते ११ खुलं असलेलं पोस्ट ऑफिस एवढंच काय तर आधुनिक जगाशी कनेक्शन.गावात एक जून गोदाम होत. पण गावात ‘गोदाम’ म्हणलं की सगळ्यांच्या मनात एकच नाव येतं ते जुनं, मोडकं Warehouse.कधी काळी तिथं गहू ठेवायचे, मग काही काळ भंगाराचं सामान... आणि गेल्या १५ वर्षांपासून ते रिकामं, धुळकट आणि बदनाम झालं होतं.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना ते गोदाम बदनाम का?तर लोक म्हणतात, "तिथं काहीतरी आहे."कोण म्हणतं "भूत", तर कोण