लेखक: अक्षय वरक.वर्ष: २०२५या चारोळ्यांत एकतर्फी प्रेम, विरह, आठवणी, हळवे क्षण, आणि मनाची भावनिक तडफड यांचा अतिशय नाजूक आणि हृदयस्पर्शी अनुभव मांडलेला आहे. शब्दांतून उमटणारा भावनांचा खोल झरा, हे या संग्रहाचं खास वैशिष्ट्य आहे.प्रत्येक चारोळी वाचकाच्या हृदयात कुठे ना कुठे जाऊन भिडते – कधी एखाद्या विसरलेल्या चेहऱ्याच्या आठवणीत, तर कधी अश्रूंनी मूक झालेल्या शब्दांत.जर कोणी वाचक असे असतील ज्यांना एखादी चारोळी अधिक भावली, तर कृपया "कोणती चारोळी सर्वात जास्त आवडली?" हे नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अमूल्य आहेत.© अक्षय वरक 2025१. 'तुला विसरणं जमलच नाही"काय सांगू तुला आता काही समजत नाहीमनाच्या या घाभाऱ्यात आज ही कोणीच नाहीतुझं नाव ओठांवर आलं