भाग ३ : गुप्त योजनारात्र गडद होत चालली होती. बाहेर कुठेतरी दूरवर एखाद्या लांडग्याचा ओरडण्यासारखा आवाज येत होता. थंड वाऱ्याच्या झुळुकीत तुरुंगाच्या सळई हलके हलके किरकिरत होत्या.कैदेतली माणसं.सरिता, आदित्य, श्रुती, पूजा, रोहित, वैशाली, प्रतीक, सचिन, अमेय, आणि मानसी. एकमेकांच्या जवळ बसलेली. कुणी अंगावर चादर ओढून बसलं होतं, तर कुणी नुसतं भिंतीला डोकं टेकवून विचारात हरवलं होतं.त्यांच्या चेहऱ्यावर दिवसाभरातला थकवा होता, पण आता राजवीरच्या कालच्या शब्दांनी त्यांच्या मनात एक वेगळाच ठिणगा पेटवली होती. भीतीचं ओझं थोडं हलकं झाल्यासारखं वाटत होतं.एका कोपऱ्यात, अंधाराच्या सावलीत, राजवीर शांत बसला होता. डोळे मिटलेले, पण त्याचा मेंदू झपाट्याने काम करत होता. चेहऱ्यावर स्थिरता, श्वास मोजून घेतल्यासारखा