अनुबंध बंधनाचे.....( भाग ४६ )आरव : वैष्णवी....! आज एवढा वेळ तु आमच्यासोबत घालवला आहेस, कसा वाटला तुला आमचा ग्रुप...?वैष्णवी : खरं सांगायचं तर, तुम्ही सर्वजण खुप छान आहात, आणि मी तुम्हा सर्वांना आधीपासुन ओळखते. फक्त भेट आत्ता झाली. कारण ऑफिस मधे प्रेम कडून मी तुमच्या ग्रुपच्या प्रत्येकजनाबद्दल ऐकुन आहे. तुमचे खुप सारे किस्से मी ऐकले आहेत. आणि मला पण तुम्हा सर्वांना भेटायची खुप इच्छा होती. फायनली त्याच्या बर्थडे च्या निमित्ताने तरी आपली भेट झाली. आणि तुम्ही सर्वजण खुपच चांगले आहात. खरच प्रेम खुप लकी आहे. कारण त्याच्याजवळ एवढा छान मित्रपरिवार आहे. आणि तुम्ही सर्व खुप भारी आहात....!आरव : आणि प्रेम....?वैष्णवी