कोण? - 30

भाग – ३०     आता मात्र सावली त्याच ठिकाणी थांबून इकडे तीकडे बघू लागली होती. तीला कुणीच दिसत नव्हते म्हणून तीला आता फक्त प्रतीक्षा होती ती पियुषचा फोनची. पाच मिनिटांनी पियुषचा फोन पुन्हा आला आणि सावलीने तो उचलला. पियुष म्हणाला, “ सावली त्याने कॉल करून समोरचा व्यक्तीला विचारले कि तू कुठे आहेस. तेव्हा त्याने  म्हटले कि तो तुझा पाठलाग करत आहे. तर समोरील व्यक्तीने त्याला तात्काळ परत फिरण्यास सांगीतले आहे, एवढे बोलून त्याने फोन ठेवला आणि आता तो तुझापासून विरुद्ध दिशेने जात आहे.” मग सावली म्हणाली, “ अरे पियुष वाईट बातमी आहे कि तू सांगीतलेल्या लोकेशनचा फोन मला या निर्जन