प्रकरण १३रात्री दोन वाजता पाणिनीला फोन च्या आवाजाने जाग आली. फोन वर सौंम्या होती.“ अत्ता माझ्या दारात पोलीस आले होते,सर. आणि मला उद्या कोर्टात ‘ती’ डायरी घेऊन हजर राहायचा समन्स बजावला गेलाय.न्या.कोलवणकर यांच्या कोर्टात. मला खूप टेन्शन आलंय.मी काय करू? ”“ आता दिवे बंद कर आणि मस्त पैकी झोपून जा.” पाणिनी म्हणाला.“ अहो सर, किती सहज घेताय तुम्ही! मला खरंच झोप येणार नाही अत्ता. कर्णिक ने नक्कीच खांडेकराना सगळ सांगितलंय.”“ काळजी करू नको. झोप निवांत.”पाणिनी पुन्हा आडवा झाला. अर्ध्या तासाने त्याच्या दाराची बेल वाजली. दारात पोलीस ऑफिसर उभा होता.त्यालाही समन्स बजावला गेला. त्याने तो सही करून घेतला.उद्या कोर्ट सुरु होण्यापूर्वी