किंकाळी प्रकरण 12

  • 327
  • 129

प्रकरण १२“ कशी चालल्ये केस?” सौंम्याने पाणिनीला तो ऑफिसला आल्या आल्याच विचारलं.“ सो सो. फार काही ठोस असं नाही अजून. धुरीच्या गाडीतून प्रज्ञा पांडव उतरली आणि डॉ.बंब च्या घराकडे गेली, तिथून झपाट्याने परत आली धुरीच्या गाडीत बसली आणि गाडी वेगात निघून गेली  हे बघणारा साक्षीदार त्यांना मिळालाय ”  पाणिनी म्हणाला.“ अरेरे!” सौंम्या निराशेने म्हणाली.“ याचा अर्थ असा नाही होत सौंम्या, की  तिने आत जाऊन डॉ.बंब न मारलं हे त्यांनी सिद्ध केलंय. त्यांच्या गाड्याला वाटतंय की डॉ.बंब त्याला बोलवायला मागच्या दारात गेले,आणि त्यांनी मागचं दार उघडलं असाव, त्याला हाक मारण्यासाठी.पण मला माहित्ये की लीना धुरी बाहेर पडल्यानंतर लगेचच कोणीतरी अज्ञात व्यक्तीने