किंकाळी प्रकरण 11

  • 45

प्रकरण ११न्यायाधीश कोलवणकर यांच्या कोर्टात निनाद धुरी वि.सरकार पक्ष ही प्राथमिक सुनावणी सुरु झाली.अॅडव्होकेट खांडेकर उठून उभे राहिले“ न्यायाधीश महाराज, मी मोकळेपणाने कबूल करतो की या खटल्यात उपलब्ध पुरावा नेमके काय दर्शवतो या बद्दल मला सांगता येणार नाही. ”न्यायाधीशांनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं.“ म्हणजे? तुम्ही पोलिसांशी किंवा साक्षीदारांशी बोलला नाहीत? केस चा अभ्यास केला नाहीत?”“ काहींशी बोललो पण सगळ्याच साक्षीदारांजवळ बोलता आलं नाही मला म्हणून माझी विनंती आहे की जर पुढची तारीख मिळाली तर आम्हाला ठोस पुरावे आणता येतील.बचाव पक्षालाही तयारी करायला वेळ मिळेल.” खांडेकर म्हणाले.“ बचाव पक्षाचं काय मत आहे? ” कोलवणकर म्हणाले.“ आमचं म्हणणं आहे की खटला चालू करावा